Saturday, July 06, 2024 10:47:59 PM

पावसामुळे सामना थांबला

पावसामुळे सामना थांबला

कोलकाता, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियम येथे सुरू आहे. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होत आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज झटपट बाद झाले आहेत. पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेची अवस्था चौदा षटकांत चार बाद ४४ धावा अशी झाली.

याआधी बुधवारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे झाला. न्यूझीलंड विरुद्धचा हा सामना भारताने सत्तर धावांनी जिंकला. उपांत्य सामना जिंकून भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात कोण खेळणार या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या निकालातून मिळणार आहे.

पहिल्या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने ५० षटकांत चार बाद ३९७ धावा केल्या. न्यूझीलंडचा डाव ४८.५ षटकांत ३२७ धावांत आटोपला. उपांत्य लढतीत न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना बाद करणारा मोहम्मद शमी सामनावीर झाला.


सम्बन्धित सामग्री