Saturday, July 06, 2024 11:02:12 PM

भारताचा फलंदाजीचा निर्णय

भारताचा फलंदाजीचा निर्णय

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात भारत - न्यूझीलंड आमनेसामने आहेत. वानखेडे स्टेडियम येथे हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वानखेडेवर यंदाच्या विश्वचषकात उपांत्य सामन्याआधी चार सामने झाले आहेत. यातील तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या आणि एक सामना दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड : डी. कॉनवे, डी. मिचेल, के. विल्यमसन (कर्णधार), टी. लॅथम (यष्टीरक्षक), आर. रवींद्र, जी. फिलिप्स, एम. चॅपमन, एम. सॅंटनर, टी. साउथी, एल. फर्ग्युसन, टी. बोल्ट


सम्बन्धित सामग्री