Saturday, July 06, 2024 11:02:45 PM

भारत - न्यूझीलंड आमनेसामने

भारत - न्यूझीलंड आमनेसामने

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेतील उपांत्य फेरी बुधवार १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. यानंतर गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांचे विजेते रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीच्या सामन्यात आमनेसामने असतील.

भारत - न्यूझीलंड सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दुपारी दीड वाजता नाणेफेक होणार आहे. भारताने स्पर्धेतील नऊ साखळी सामने जिंकले आहेत. यामुळे भारत विजयी घोडदौड सुरू ठेवतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (उपकर्णधार) , ईशान किशन , सूर्यकुमार यादव , रवींद्र जडेजा , शार्दुल ठाकूर , जसप्रीत बुमराह , कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , रविचंद्र, अश्विन कृष्णा , मोहम्मद सिराज

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार) , ट्रेंट बोल्ट , मार्क चॅपमन , डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन , टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल , जेम्स नीशम , ग्लेन फिलिप्स , रचिन रवींद्र , मिशेल सँटनर , ईश सोधी , टिमंग साऊदी , काइल जेमिसन

क्रिकेट विश्वचषक २०२३
१. भारत : नऊ साखळी सामन्यांत विजय
२. न्यूझीलंड : नऊ पैकी पाच साखळी सामन्यांत विजय
३. न्यूझीलंड विरुद्धचा साखळी सामना भारताने चार गडी राखून जिंकला


सम्बन्धित सामग्री