Saturday, July 06, 2024 11:25:46 PM

भारत - नेदरलँड रविवारी आमनेसामने

भारत - नेदरलँड रविवारी आमनेसामने

बंगळुरू, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेतील भारताचा नववा साखळी सामना रविवारी आहे. नववा सामना होण्याआधीच भारत विश्वचषकाच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारत आणि नेदरलँड रविवारी आमनेसामने असतील. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्यासाठी दुपारी दीड वाजता नाणेफेक होईल. भारताने यंदाच्या विश्वचषकातील आठ साखळी सामने जिंकून १६ गुण मिळवले आहेत. भारताची धावगती +२.४५६ आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक) , शुभमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी , जसप्रीत बुमराह , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज , प्रसिद्ध कृष्णा , रविचंद्रन अश्विन , ईशान किशन, शार्दुल ठाकूर
नेदरलँड : वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (डब्ल्यू/सी), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन, साकिब ज्युक्लॅफ, साकिब ज्युक्लेफ सिंग, शरीझ अहमद, नोहा क्रोस

नेदरलँड : वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन, साकिब ज्युक्लॅफ, साकिब ज्युक्लेफ सिंग, शरीझ अहमद, नोहा क्रोस

क्रिकेट विश्वचषक २०२३
भारताचे विजय
१. विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारताचा सहा गडी राखून विजय
२. विरुद्ध अफगाणिस्तान, भारताचा आठ गडी राखून विजय
३. विरुद्ध पाकिस्तान, भारताचा सात गडी राखून विजय
४. विरुद्ध बांगलादेश, भारताचा सात गडी राखून विजय
५. विरुद्ध न्यूझीलंड, भारताचा चार गडी राखून विजय
६. विरुद्ध इंग्लंड, भारताचा शंभर धावांनी विजय
७. विरुद्ध श्रीलंका, भारताचा ३०२ धावांनी विजय
८. विरुद्ध दक्षिण आफ्रिका, भारताचा २४३ धावांनी विजय


सम्बन्धित सामग्री