Saturday, July 06, 2024 11:03:01 PM

श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड बरखास्त

श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड बरखास्त

कोलंबो, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला. भारताने लंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ५० धावांत ऑलआऊट केले होते. तो सामना भारताने ३१७ धावांनी जिंकला होता. या एवढ्या मोठ्या अपयशाचा परिणाम श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर झाला आहे. बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी राजीनामा दिला आहे. क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंकेचा राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड बरखास्त केला आहे. अर्जुन रणतुंगा यांना श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच श्रीलंका क्रिकेटसाठी एका हंगामी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती आणि बोर्डाच्या एका माजी अध्यक्षांचा समावेश आहे.


सम्बन्धित सामग्री