Tuesday, July 02, 2024 09:16:23 AM

अबब, न्यूझीलंडचा विक्रमांचा डोंगर

अबब न्यूझीलंडचा विक्रमांचा डोंगर

बंगळुरू, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३५ व्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने विक्रमांचा डोंगर उभारला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकांत सहा बाद ४०१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने २५.३ षटकांत एक बाद २०० धावा केल्या. पावसामुळे सामन्यात वारंवार व्यत्यय येत आहे. आता पण पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे.

न्यूझीलंडचा विक्रमांचा डोंगर

१. रचिन आणि केनची दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी
२. केन विलियमसनने विश्वचषकात हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने २४ डावांत ही कामगिरी केली. विश्वचषकात हजार धावांचा टप्पा पार करणारा तो दहावा क्रिकेटपटू.
३. केनने केला विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावांचा विक्रम
४. रचिन रविंद्रनने कारकिर्दीतल्या पहिल्या विश्वचषकात पाचवेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. याआधी न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.
५. न्यूझीलंडकडून एका विश्वचषकात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम रचिनच्या नावावर. यंदाच्या विश्वचषकातील हे त्याचे तिसरे शतक.
६. रचिन २५ वर्ष होण्याआधी विश्वचषकात शतक करणारा सचिन नंतरचा दुसरा फलंदाज. सचिनने २२ वर्ष ३१३ व्या दिवशी शतक केले तर रचिनने २३ वर्ष ३५१ व्या दिवशी ही कामगिरी केली.
७. मिशेलच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात हजार धावा पूर्ण
८. रचिन २५ वर्ष पूर्ण होण्याआधी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर. त्याने आतापर्यंत ५२३ धावा केल्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरने १९९६ च्या विश्वचषकात ५२३ धावा केल्या होत्या.
९. पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रचिन दुसऱ्या स्थानी. जॉनी बेयरस्टो पहिल्या स्थानी.
जॉनी बेयरस्टो- ११ डावात ५३२ धावा- २०१९
रचिन रविंद्रन- ८ डावात ५२२ धावा- २०२३
बाबर आझम- ८ डावात ४७४ धावा- २०१९
बेन स्टोक्स- १० डावात ४६५ धावा- २०१९
१०. पाकिस्तान विरुद्धची विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या न्यूझीलंडने रचली
११. न्यूझीलंडची ही एकदिवसीय क्रिकेटमधली दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या. त्यांनी २००८ मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ४०२ धावा केल्या होत्या.


सम्बन्धित सामग्री