Tuesday, July 02, 2024 09:12:29 AM

भारताचा दणदणीत विजय

भारताचा दणदणीत विजय

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धचा साखळी सामना भारताने ३०२ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने सलग सातवा साखळी सामना जिंकला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या स्पर्धेतील ३३ व्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत आठ बाद ३५७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला १९.४ षटकांत सर्वबाद ५५ धावा करणे जमले. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सामनावीर झाला. त्याने पाच षटकांत अठरा धावा देत पाच बळी घेतले.

https://twitter.com/BCCI/status/1720094481113108780

श्रीलंकेकडून पाठुम निस्संकाने शून्य, दिमुथ करुणारत्नेने शून्य, सदीरा समरविक्रमाने शून्य, कुसल मेंडिसने एक, चारिथ असलंकाने एक, दुषण हेमंताने शून्य, दुष्मंथा चमीराने शून्य, अँजेलो मॅथ्यूजने बारा, कसून रजिथाने चौदा, दिलशान मधुशंकाने पाच, महेश थेक्षानाने नाबाद बारा धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, मोहम्मद सिराजने तीन, जसप्रीत बुमराहने एक आणि रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.

https://twitter.com/BCCI/status/1720100942362837063

याआधी भारताकडून रोहित शर्माने ४, शुभमन गिलने ९२, विराट कोहलीने ८८, केएल राहुलने २१, सूर्यकुमार यादवने १२, श्रेयस अय्यरने ८२, मोहम्मद शमीने २ (धावचीत), रवींद्र जडेजाने ३५ (धावचीत), जसप्रीत बुमराहने नाबाद १ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने पाच तर दुष्मंथा चमीराने एक बळी घेतला.

https://twitter.com/JayShah/status/1720096497306566768

क्रिकेट विश्वचषक, भारत विरुद्ध श्रीलंका
भारताचा ३०२ धावांनी विजय
श्रीलंका १९.४ षटकांत सर्वबाद ५५
भारत ५० षटकांत आठ बाद ३५७ धावा


सम्बन्धित सामग्री