Saturday, July 06, 2024 11:28:20 PM

वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पुतळा

वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पुतळा

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : वानखेडे क्रिकेट स्टेडियम येथे विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. याप्रसंगी सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली, मुलगी सारा, बीसीसीआय तसेच मुंबई क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

वानखेडे स्टेडियम हे सचिनचे होम ग्राऊंड आहे…अनेक सामने या मैदानावर तो खेळला …२०११ चा विश्वचषक भारताने वानखेडेवरच जिंकला…आणि त्या संघात सचिन होता….आणि महत्त्वाचे म्हणजे सचिनने वानखेडे स्टेडियमवरच शेवटचा सामना खेळला…आणि क्रिकेटमधून निवृत्ती झाला…त्याच मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झाले…नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आलाय….

सचिनच्या पुतळ्याची १० फूट उंची
हातामधील बॅट ४ फूट, त्याखाली संपूर्ण जग बॉल म्हणून दाखवलंय
पुतळ्याच्या खालील भागात सचिनच्या प्रमुख विक्रमांची नोंद
सचिनच्या पुतळ्याची एकूण उंची २२ फूट
नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली कलाकृती

महत्त्वाचे

क्रिकेटचा देव - सचिन

भारतरत्नने सन्मानित एकमेव क्रीडापटू

क्रिकेट विश्वातील अनेक विक्रम रचणारा

कसोटीत ५१ शतके आणि ६८ अर्धशतके

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतके

कसोटीतील सचिनची सर्वोत्तम धावसंख्या : नाबाद २४८

एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनची सर्वोत्तम धावसंख्या : नाबाद २००


सम्बन्धित सामग्री