Tuesday, July 02, 2024 08:36:16 AM

हार्दिक पांड्या विश्वचषकाला मुकणार

हार्दिक पांड्या विश्वचषकाला मुकणार

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना टाचेला दुखापत झाली. ही दुखापत बरी होण्यासाठी हार्दिकला किमान दोन आठवडे विश्रांती आणि उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे हार्दिक पांड्या क्रिकेट विश्वचषकातील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. दुखापत झाल्यामुळे हार्दिक न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकला. आता तो क्रिकेट विश्वचषकातील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता वाढली आहे.

भारताची यंदाच्या विश्वचषकातील कामगिरी

भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड या पाच संघांविरुद्धचे साखळी सामने जिंकले आहेत. हे सर्व सामने जिंकल्यामुळे भारताने दहा गुण मिळवले आहेत. भारताचा सहावा साखळी सामना रविवार २९ ऑक्टोबर रोजी आहे.

२९ ऑक्टोबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध इंग्लंड
२ नोव्हेंबर २०२३, गुरुवार : भारत विरुद्ध श्रीलंका
५ नोव्हेंबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१२ नोव्हेंबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध नेदरलँड


सम्बन्धित सामग्री