Tuesday, July 02, 2024 08:30:02 AM

भारताने बांगलादेशला नमवले

भारताने बांगलादेशला नमवले

पुणे, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचा सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील सलग चौथा साखळी सामना जिंकला. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरुद्धचे सामने भारताने जिंकले.

पुण्यात भारत - बांगलादेश सामना झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद २५६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा केल्या.

भारताकडून रोहित शर्माने ४८, शुभमन गिलने ५३, विराट कोहलीने नाबाद १०३, श्रेयस अय्यरने १९, केएल राहुलने नाबाद ३४ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने गिल आणि अय्यरला बाद केले तर हसन महमूदने रोहित शर्माला बाद केले.

https://twitter.com/BCCI/status/1715038461496033713

बांगलादेशचा डाव कोसळला

प्रथम फलंदाजी करताना दमदार सलामीनंतर बांगलादेशचा डाव कोसळला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तान्झिद हसनने ५१ तर महमुदुल्लाने ४६ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन बळी घेतले. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी एक बळी घेतला.

बांगलादेश : तान्झिद हसन ५१ धावा, नजमुल हुसेन शांतो ८ धावा, मेहदी हसन मिराज ३ धावा, लिटन दास ६६ धावा, तौहीद हृदोय १६ धावा, मुशफिकुर रहिम ३८ धावा, नसूम अहमद १४ धावा, महमुदुल्लाह ४६ धावा, मुस्तफिजुर रहमान नाबाद १ धाव, शरीफुल इस्लाम नाबाद ७ धावा

https://twitter.com/BCCI/status/1715038839826415954

सामनावीर : विराट कोहली
९७ चेंडूत नाबाद १०३ धावा
४ षटकार, ६ चौकार


सम्बन्धित सामग्री