Sunday, July 07, 2024 12:39:19 AM

दमदार सलामीनंतर बांगलादेशचा डाव कोसळला

दमदार सलामीनंतर बांगलादेशचा डाव कोसळला

पुणे, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत - बांगलादेश सामन्यात बांगलादेशने ५० षटकांत आठ बाद २५६ धावा केल्या. दमदार सलामीनंतर बांगलादेशचा डाव कोसळला. बांगलादेशचा पहिला बळी ९३ धावा झाल्यानंतर गेला. यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले आणि बांगलादेशचा डाव कोसळला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तान्झिद हसनने ५१ तर महमुदुल्लाने ४६ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन बळी घेतले. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी एक बळी घेतला. भारतापुढे ५० षटकांत २५७ धावा करण्याचे आव्हान आहे.

बांगलादेश : तान्झिद हसन ५१ धावा, नजमुल हुसेन शांतो ८ धावा, मेहदी हसन मिराज ३ धावा, लिटन दास ६६ धावा, तौहीद हृदोय १६ धावा, मुशफिकुर रहिम ३८ धावा, नसूम अहमद १४ धावा, महमुदुल्लाह ४६ धावा, मुस्तफिजुर रहमान नाबाद १ धाव, शरीफुल इस्लाम नाबाद ७ धावा


सम्बन्धित सामग्री