Sunday, July 07, 2024 12:17:45 AM

पुण्यात भारत - बांगलादेश आमनेसामने

पुण्यात भारत - बांगलादेश आमनेसामने

पुणे, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सतरावा साखळी सामना गुरुवारी पुण्यात होणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश हा साखळी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता या सामन्यासाठी नाणेफेक होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे.

यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेशचे प्रत्येकी तीन साखळी सामने खेळून झाले आहेत. भारताने तिन्ही साखळी सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने त्यांचा तीन पैकी एक साखळी सामना जिंकला आहे. पुण्यातील सामन्याच्या निमित्ताने भारत विजयाची घोडदौड सुरू ठेवण्यास तर बांगलादेश दुसरा विजय मिळवण्यास उत्सुक आहे.

गुरुवारच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन खेळणार की नाही हे अद्याप समजलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धावताना शकीब अल हसनला दुखापत झाली आहे. फिट असेल तरच तो भारताविरुद्ध खेळेल, नाहीतर त्याला विश्रांती दिली जाईल, असे बांगलादेश संघ व्यवस्थापनाने सांगितले.

क्रिकेट विश्वचषक २०२३
भारत विरुद्ध बांगलादेश
गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
नाणेफेक : भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता
थेट प्रक्षेपण : भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजल्यापासून

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्टीरक्षक) , शुभमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , शार्दुल ठाकूर , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज , इशान किशन , सूर्यकुमार , मोहम्मद शविंद्रन , अश्विन , मोहम्मद यादव

बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार) , मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक) , लिटन दास , तन्झिद हसन , मेहदी हसन मिराझ , नजमुल हुसेन शांतो , तौहिद हृदोय , महमुदुल्लाह , तस्किन अहमद , मुस्तफिजुर रहमान , शरीफुल इस्लाम , साबसान हसन , महसान हसन , महेदी हसन , नसूम अहमद


सम्बन्धित सामग्री