Saturday, July 06, 2024 11:18:25 PM

भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने

भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बुधवारी दुपारी भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक दुपारी दीड वाजता होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना जिंकल्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे भारताकडून दिल्लीतल्या सामन्यात चांगल्या कामगिरीची आशा भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक) , हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार) , इब्राहिम झद्रान , रहमत शाह , नजीबुल्ला जद्रान , मोहम्मद नबी , अजमतुल्ला ओमरझाई , रशीद खान , मुजीब उर रहमान , नवीन-उल-हक , फझलहक फारुकी , इकराम अली रहमान , अब्दुल रहमान , इकराम अली हसन , नूर अहमद

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
एकदिवसीय सामना
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
थेट प्रक्षेपण : दुपारी दोन वाजल्यापासून


सम्बन्धित सामग्री