Sunday, July 07, 2024 12:39:21 AM

घोडेस्वारीत ४१ वर्षांनंतर सुवर्ण, भारताला आशियाडमध्ये १४ पदके

घोडेस्वारीत ४१ वर्षांनंतर सुवर्ण भारताला आशियाडमध्ये १४ पदके

हँगझोऊ, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत अर्थात आशियाडमध्ये भारताने आतापर्यंत चौदा पदके जिंकली आहेत. यात तीन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे.

अश्वारोहण या प्रकारात भारताने ४१ वर्षांनंतर सुवर्ण पदक जिंकले. याआधी १९८२ च्या आशियाडमध्ये भारताने अश्वारोहण या प्रकारात पदक जिंकले होते. टीम ड्रेसेजमध्ये भारतीय संघाने एकूण २०९.२०५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर २०४.८८२ गुणांसह चीनने रौप्य आणि हाँगकाँग चीन २०४.८५२ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. याआधी नौकानयनमध्ये नेहा ठाकूरने रौप्य तर इबाद अलीने कांस्य पदक जिंकवून दिले.

१. सुदीप्ती हजेला, हृदय विपुल छेडा, अनुष गरवाला, दिव्यकृती सिंग - अश्वारूढ संघ ड्रेसेज - सुवर्ण पदक
२. भारताचा महिला क्रिकेट संघ – २० षटकांची क्रिकेट स्पर्धा – सुवर्ण पदक
३.रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार – पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ – सुवर्ण पदक
४. नेहा ठाकूर – नौकानयन – मुलींची डिंगी, ILCA4 – रौप्य पदक
५. नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, डीयू पांडे – रोइंग – आठ पुरुष – रौप्य पदक
६. आशी चौकसे, मेहुली घोष, रमिता जिंदाल – नेमबाजी – महिला दहा मीटर एअर रायफल संघ – रौप्य पदक
७. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग – रोइंग – पुरुषांचे लाईट दुहेरी स्कल्स – रौप्य पदक
८. इबाद अली – नौकानयन – पुरुष विंडसर्फर, RS:X – कांस्य पदक
९. बाबू लाल यादव आणि लेख राम – रोइंग – पुरुष जोडी – कांस्य पदक
१०. रमिता जिंदाल – नेमबाजी – महिलांची दहा मीटर एअर रायफल – कांस्य पदक
११. जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष – रोइंग – चार पुरुष – कांस्य पदक
१२. परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग – चार पुरुष – कांस्य पदक
१३. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर – नेमबाजी – पुरुषांची दहा मीटर एअर रायफल – कांस्य पदक
१४. विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग, अनिश भानवाला – नेमबाजी – पुरुष पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ – कांस्य पदक


सम्बन्धित सामग्री