Saturday, July 06, 2024 11:59:59 PM

आशियाई खेळात भारताला दहा पदके

आशियाई खेळात भारताला दहा पदके

हँगझोऊ, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दहा पदके जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे.

१.रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार - पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ - सुवर्ण पदक
२. नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, डीयू पांडे - रोइंग - आठ पुरुष - रौप्य पदक
३. आशी चौकसे, मेहुली घोष, रमिता जिंदाल - नेमबाजी - महिला दहा मीटर एअर रायफल संघ - रौप्य पदक
४. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग - रोइंग - पुरुषांचे लाईट दुहेरी स्कल्स - रौप्य पदक
५. बाबू लाल यादव आणि लेख राम - रोइंग - पुरुष जोडी - कांस्य पदक
६. रमिता जिंदाल - नेमबाजी - महिलांची दहा मीटर एअर रायफल - कांस्य पदक
७. जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष - रोइंग - चार पुरुष - कांस्य पदक
८. परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग - चार पुरुष - कांस्य पदक
९. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर - नेमबाजी - पुरुषांची दहा मीटर एअर रायफल - कांस्य पदक
१०. विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग, अनिश भानवाला - नेमबाजी - पुरुष पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ - कांस्य पदक


सम्बन्धित सामग्री