Tuesday, July 02, 2024 09:34:39 AM

भारत - ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर

भारत - ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर

मुंबई, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. भारतात होणार असलेल्या या मालिकेसाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला. पहिल्या दोन सामन्यांसाठी एक तर तिसऱ्या सामन्यासाठी दुसरा संघ निवड समितीने जाहीर केला आहे. खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1703796673066213567

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका
सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल.

शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ : बिंद्रा स्टेडियम, मोहाली, पंजाब
रविवार २४ सप्टेंबर २०२३ : होळकर स्टेडियम, इंदूर, मध्य प्रदेश
बुधवार २७ सप्टेंबर २०२३ : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट, गुजरात

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

           

सम्बन्धित सामग्री