Tuesday, July 02, 2024 08:28:37 AM

रोहित शर्माने ओलांडला १० हजार धावांचा टप्पा

रोहित शर्माने ओलांडला १० हजार धावांचा टप्पा

कोलंबो, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. हे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतले रोहितचे दहावे अर्धशतक आहे. याआधी सचिन तेंडुलकरने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आठ अर्धशतके करण्याची कामगिरी केली होती.

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ५३ धावा केल्या. त्याने सात चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी केली. रोहितने या सामन्यात शाहिद आफ्रिदीचा षटकारांचा विक्रम मोडला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने षटकार मारून अर्धशतक केले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर : १८४२६
विराट कोहली : १३०२४
सौरव गांगुली : ११३६३
राहुल द्रविड : १०८८९
महेंद्रसिंह धोनी : १०७७३
रोहित शर्मा : १०००१

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २०२३

भारत वि. नेपाळ : रोहित शर्मा नाबाद ७४ धावा
भारत वि. पाकिस्तान : रोहित शर्मा ५६ धावा
भारत वि. श्रीलंका : रोहित शर्मा ५३ धावा

धावफलक

आशिया चषक : भारत वि. श्रीलंका
पावसाचा व्यत्यय
भारत : ४७ षटकांत ९ बाद १९७ धावा

           

सम्बन्धित सामग्री