Tuesday, July 02, 2024 08:49:10 AM

भारताचे दिग्गज अंपायर पीलू रिपोर्टर यांचं निधन

भारताचे दिग्गज अंपायर पीलू रिपोर्टर यांचं निधन

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: आपल्या हटके स्टाईल अंपायरिंगने असंख्य क्रिकेट चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या दिग्गज माजी अंपायरचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारताचे माजी अंपायर पिलू रिपोर्टर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पिलू रिपोर्टर यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिलू रिपोर्टर यांची अंपायर म्हणून २८ वर्षांची कारकीर्द राहिली. रिपोर्टरने ३४ आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली, ज्यात १४ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. रिपोर्टर अंपायर म्हणून कारकीर्दीला सुरुवात करण्याआधी वीज विभागात कार्यरत होते.

पीलू रिपोर्टर हे क्रिकेट विश्वात पाऊल ठेवण्याआधी एमएसईबीत कामाला होते. त्या दरम्यान एमसीए तेव्हाचं बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने अंपायर जागांसाठी पदभरती काढली. पीलू रिपोर्टर याने अर्ज केला. पीलू रिपोर्टर यांची तेव्हा निवड झाली नाही. पीलू यांनी न खचता स्थानिक क्रिकेटकडे मोर्चा वळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरी करण्याआधी त्यांनी रणजी सामन्यांमध्ये अंपायरिंग केलं.

पीलू रिपोर्टर यांना १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये अंपायरसाठी निवड करण्यात आली. तसेच पीलू रिपोर्टर हे पहिले तटस्थ अंपायर होते. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान याने १९८६ मध्ये पीलू रिपोर्टर आणि वीके रामास्वामी या दोघांना विंडिजमध्ये अंपायरिंगसाठी बोलावलं होतं.


सम्बन्धित सामग्री