Tuesday, July 02, 2024 08:04:06 AM

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या या १५ नावांवर शिक्कामोर्तब

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या या १५ नावांवर शिक्कामोर्तब

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : एकदिवसीय विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी जय्यत तयारी केली आहे. भारतानेही आपल्या खेळाडूंची यादी तयार केली आहे. मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. संजू सॅमसनला या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. आशिया चषक 2023 साठी राखीव खेळाडू म्हणून सॅमसन भारतीय संघासोबत श्रीलंकेला गेला आहे.

एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयने विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. तर संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. सॅमसनसोबत प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा यांनाही भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. तर इशान किशनला संघात स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनाही स्थान दिले आहे.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने टीम इंडियामध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनाही स्थान दिले आहे. गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा वर्ल्डकपसंघात समावेश आहे. फिरकीपटू कुलदीप यादवलाही संघात स्थान मिळू शकते. बीसीसीआयला ५ सप्टेंबरपर्यंत विश्वचषक 2023 साठी संघ जाहीर करायचा आहे. केएल राहुलच्या फिटनेसची बोर्डाने विशेष काळजी घेतली आहे. रिपोर्टनुसार, मेडिकल टीमने राहुलच्या फिटनेसबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे. राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खूप मेहनत घेत आहे. तो नेटमध्ये चांगला खेळत आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी भारताचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


सम्बन्धित सामग्री