Saturday, July 06, 2024 11:32:00 PM

chess-world-cup-2023-final-praggnanandhaa-vs-magnus-carlsen-game-1-ends-in-draw-caruana-loses
प्रज्ञानानंद आणि कार्लसनमधील बुद्धिबळाचा पहिला डाव अनिर्णित

प्रज्ञानानंद आणि कार्लसनमधील बुद्धिबळाचा पहिला डाव अनिर्णित

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद आणि नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात चुरस आहे. अंतिम सामन्यातील पहिला डाव अनिर्णित राहिला. या डावात दोन्ही खेळाडूंनी मिळून ३५ चाली खेळल्या. https://twitter.com/FIDE_chess/status/1694259876203999254 रमेशबाबू प्रज्ञानानंद आणि मॅग्नस कार्लसन हे दोन्ही खेळाडू पुढील डाव खेळण्यासाठी संध्याकाळी पुन्हा आमनेसामने येतील. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून रमेशबाबू प्रज्ञानानंद याने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात बाजी मारली तर भारताचा रमेशबाबू प्रज्ञानानंद बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होणार आहे.


सम्बन्धित सामग्री