Tuesday, July 02, 2024 08:49:56 AM

asia-cup-selection-on-monday
आशिया चषकासाठी सोमवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक

आशिया चषकासाठी सोमवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक

नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक होणार आहे. ही बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला निवड समितीचे सदस्य, कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे उपस्थित राहणार आहेत. आशिया चषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुढे विश्वचषक स्पर्धेत संधी मिळणार आहे. यामुळे आशिया चषकात कोणाला संधी मिळते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, प्रसिध कृष्णा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या खेळाडूंमधून निवड होण्याची शक्यता आहे. फलंदाजीसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, टिळक वर्मा या खेळाडूंमधून निवड होण्याची शक्यता आहे. खेळाडूंची निवड करताना फिटनेस आणि कामगिरी या दोन्हीचा गंभीरपणे विचार केला जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री