सध्या अनेकांना आपला भविष्य कसे असेल? हा प्रश्न नेहमी पडतो. तर काहींना आपल्यासाठी हे वर्ष कसे जाणार? हा प्रश्न सतावतो. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ज्योतिषांकडे जाऊन आपल्या समस्यांचे निवारण करतात. मात्र अनेकदा असे देखील ज्योतिष पाहायला मिळतात जे काही पैश्यांसाठी लोकांची फसवणूक करतात. मात्र काही असेदेखील खरे ज्योतिष आहेत जे सटीक भविष्यवाणी सांगतात. त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. त्यापैकीच नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या ज्या अगदी खऱ्या ठरल्या. त्यांची भविष्यवाणी एकदम तंतोतंत असते. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत बाबा वेंगा ज्यांनी भविष्यवाणी खरी ठरली.
हेही वाचा: 'या' मंदिरातील दरवाजा उघडताच होईल जगाचा नाश
कोण आहेत बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांचे संपूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे आहे. त्या बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 मध्ये झाला असून त्यांनी अनेक वर्ष बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट भागात वास्तव्य केले. बाबा वेंगा अंध होत्या. मात्र 1970 ते 1980 च्या काळात बाबा वेंगा यांनी केलेल्या सटीक भविष्यवाण्यांमुळे त्या युरोपमध्ये प्रसिद्ध झाल्या.
बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी झाली खरी:
बाबा वेंगा जगप्रसिद्ध भविष्यकार होत्या, त्यांनी दुसरं महायुद्ध, ते अमेरिकेवरील हल्ला आणि हिटरलचा मृत्यू अशा अनेक त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. त्यांनी केलेल्या 9/11 चे हल्ले, लंडनमधील प्रसिद्ध राजकुमारी डायनाचा मृत्यू, अश्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या.
बाबा वेंगा यांनी कोणती भविष्यवाणी केली?
त्यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करेल आणि त्यासोबतच त्या खंडाची लोकसंख्यादेखील नष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रशिया जगभरात आपले वर्चस्व गाजवेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 2014 पासून ते आजही रशिया आणि युक्रेन वार यांच्यामध्ये होणारा आक्रमण संपूर्ण जग पाहत आहे.
हेही वाचा: Secrets of Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरातील रहस्य ऐकताच व्हाल थक्क
बाबा वेंगा यांनी केली 2025 वर्षाची भविष्यवाणी:
बाबा वेंगा यांनी केलेल्या 2025 वर्षाची भविष्यवाणी सर्वांची चिंता वाढवणार असून त्यांच्या मते, 2025 पासून अंतिम काळाची सुरुवात होणार आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, 2025 वर्षी युरोपमध्ये एका भयानक युद्धाची सुरुवात होऊ शकते. यामुळे मोठे संकट येणार असून त्यात जिवीतहानी आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)