Sunday, March 16, 2025 07:11:11 PM

'हे' देवता करतात रात्रीच्या प्रवासादरम्यान कोकणातील रहिवाशांचे संरक्षण

कोकणात अनेक लोकदैवते आहेत, जी कोकणातील लोकांच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते देवता, जे आजही कोकण रहिवासीयांचे रक्षण करतात.

हे देवता करतात रात्रीच्या प्रवासादरम्यान कोकणातील रहिवाशांचे संरक्षण

कोकण हा समुद्रकिनारी वसलेला, घनदाट जंगलांनी वेढलेला आणि निसर्गसंपन्न असा महाराष्ट्रातील महत्वाचा भाग आहे. प्राचीन काळापासून कोकणातील लोकांच्या जीवनशैलीत आणि प्रवासाच्या सवयींमध्ये स्थानिक देव-देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. कोकण रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोकणात रात्रीच्यावेळी प्रवास करताना आम्ही अनेकदा नकारात्मक शक्तींना जवळून पाहिलंय. त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे यासाठी, आम्ही आमच्या राखणदाराची पूजा करतो आणि तेच आम्हाला नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतात'. त्यामुळे अनेक कोकणचे रहिवासी त्यांची आवर्जून पूजा करतात. कोकणात अनेक लोकदैवते आहेत, जी कोकणातील लोकांच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते देवता, जे आजही कोकण रहिवासीयांचे रक्षण करतात. 


रात्रीच्या प्रवासात कोकण रहिवाशांचे संरक्षण करणारे देवता:

कोकणात रात्रीच्या प्रवासादरम्यान संरक्षण करणारे देवता म्हणजे 'भैरव' (कालभैरव) आणि वेताळ, ग्रामदैवत व काही ठिकाणी "जाखूबा" किंवा "बेटाळ" असेदेखील मानले जाते.

 

हेही वाचा: Chandra Grahan 2025: होळीला चंद्र एवढ्या मिनिटांसाठी लाल होणार; ब्लड मूनबद्दल तुम्हाला माहिती आहे?

 

1 - कालभैरव:

कालभैरव हा भगवान शिवाचा एक रौद्र रूप आहे. कालभैरव कोकणातील दारुक वनात वास्तव्य करणारे आणि अघोरी तंत्राचे रक्षण करणारे देवता असे मानले जाते. कोकणातील गावागावांमध्ये भैरवनाथाची मंदिरे आढळतात. विशेषतः जंगलाच्या किंवा गावाच्या सीमेवर कालभैरवांची स्थापना केलेली असते. मान्यतेनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास करताना भैरवनाथाचे स्मरण केल्यास किंवा त्याचे "जय भैरव" असे नाव घेतल्यास ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात.


2 - वेताळ:

वेताळ कोकण आणि गोवामधील एक स्थानिक देवता आहे. त्यांची पूजा विशेषतः कोकण आणि गोवामधील भागात मोठ्या प्रमाणात पूजा करतात. कोकणातील रहिवाशांच्या श्रद्धेनुसार, वेताळ देवांना गावाचे रक्षणकर्ते मानतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. असे म्हणतात की, वेताळ आपल्या गावातील माणसांना संकटातून वाचवतो आणि रात्रीच्या वेळी त्यांचे संरक्षण करतो. गावाच्या वेशीवर किंवा जंगलाच्या किनारी वेताळ देवाची स्थापना करतात. 


3 - जाखूबा:

जाखूबा हे कोकणातील काही भागांमध्ये पूजले जाणारे देवता आहे. त्यांना विशेषतः प्रवासी आणि व्यापाऱ्यांचे रक्षणकर्ते मानतात. कोकणातील काही गावांमध्ये जाखूबाची जत्रा भरते आणि त्याच्या नावाने नवस बोलले जातात. असे म्हणतात की जाखूबाचे नाव घेतल्यास प्रवास सुरक्षित होतो.


4 - बेटाळ:

वेताळ देवाप्रमाणेच, बेटाळ देखील एक स्थानिक देवता आहे. बेटाळ देवाची मोठ्या प्रमाणात गोवा आणि सिंधुदुर्ग भागात पूजा केली जाते. बेटाळ देवाला शौर्य आणि पराक्रमाचे मानले जाते. गावाच्या सीमेवर बेटाळ देवाचे मंदीर असते. मान्यतेनुसार, प्रवासाच्या आधी टाळ देवाचे स्मरण केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते. 

 

(Discliamer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री