देहू : प्रसिद्ध शिव व्याख्याते तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. हभप शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. प्रसिद्ध शिव व्याख्याते त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांचं पडलाय. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी हभप शिरीष महाराज मोरे यांनी चार चिठ्या लिहल्या असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान कर्जापायी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं असून संपूर्ण देहूवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला.
हेही वाचा: नाशकात रामकुंड परिसरात कडेकोट बंदोबस्त
हभप शिरीष महाराज मोरे यांनी वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी टोकाचे पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी त्यांनी आई, बाबा, बहीण, होणारी बायको आणि मित्रांना चिठ्या लिहल्या असल्याचं समोर आलंय.
आई-बाबा आणि बहिणीसाठी पत्र :
माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे. मी कोणाकडून किती कर्ज घेतलय याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नाव आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करीत आहे. एकूण ३२ लाखांचे कर्ज आहे. त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. मला वाटत होत मी हे कर्ज फेडू शकतो. पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
होणाऱ्या पत्नीसाठी पत्र :
होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती. पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठे थांबू नकोस. तुझं आयुष्य जग.
आत्महत्येच्या अवघ्या 20 दिवसांपूर्वी हभप शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्याच लग्न असल्याच्याही चर्चा होत्या. परंतु त्यांनी पत्रेद्वारे त्यांच्या होणाऱ्या पत्नीची माफी मागितलीय.