मुंबई : रविवारी माघी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे. विशेष म्हणजे संकष्टी दिवशी 2 शुभ योग तयार होत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगात गणेशाची पूजा करता येणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यानं सर्व विघ्नांपासून सुटका मिळते आणि गणपतीच्या आशीर्वादानं सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतात. चंद्रोदय झाल्यानंतर त्याला अर्घ्य देऊन मगच संकष्टीचा उपवास सोडला जातो. त्याशिवाय उपवास पूर्ण मानला जात नाही. माघी संकष्टी चतुर्थीची माहिती? पूजा मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.
पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11:52 वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथी 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 2.15 वाजेपर्यंत वैध आहे. उदयतिथी आणि चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या वेळेच्या आधारे माघ संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवार, 16 फेब्रुवारी रोजी पाळले जाईल.
हेही वाचा - शनीदेव आहेत मेहरबान! मग चिंता कसली.. पुढच्या दीड महिन्यात 'या' राशी होणार मालामाल
या वर्षी माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 6:59 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:31 पर्यंत राहील. या काळात अमृत सिद्धी योग देखील तयार होईल. याशिवाय धृति योग सकाळी 8:06 पर्यंत असेल. त्यानंतर शूल योग तयार होईल. संकष्टी चतुर्थीची पूजा सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योगात करण्याचे भाग्य मिळेल.
संकष्टी चतुर्थी 2025 मुहूर्त - माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5:16 ते 6:07 पर्यंत असतो. हा काळ स्नान आणि दानधर्मासाठी खूप शुभ मानला जातो. चतुर्थीचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 12:58 पर्यंत आहे.
संकष्टी चतुर्थी 2025 चंद्रोदय - संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याचे महत्त्व आहे. चतुर्थीच्या व्रताच्या रात्री 9.49 वाजता चंद्रोदय होईल. चंद्र उगवल्यावर चंद्राला जल अर्पण करून व्रत पूर्ण केले जाते.
हेही वाचा - माघ पौर्णिमेला 'या' स्तोत्राचं करा पठण; आयुष्यात समृद्धी राहील, लक्ष्मी माता उजळवेल तुमचं भाग्य
गणेश पूजा मंत्र - गणपतीची पूजा करण्यासाठी तुम्ही ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करू शकता. गणेशाच्या बीजमंत्र गं चाही जप करावा आहे. या मंत्राचा जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात.
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व - संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लोक संकल्प करतात, उपवास करतात आणि पूजा करतात. भगवान गणेशाच्या कृपेने कामातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. माणसाच्या आयुष्यातील त्रास आणि समस्या दूर होतात. शुभकार्य वाढते. पूजेच्या वेळी, संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचावी.