Thursday, November 21, 2024 09:36:22 PM

महिलांच्या मतपेढीसाठी अजित पवारांचे प्रयत्न

अजित पवार सोमवारी २२ जुलै रोजी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या चार सभांना उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात अजित पवार पारनेर

महिलांच्या मतपेढीसाठी अजित पवारांचे प्रयत्न


अजित पवार सोमवारी २२ जुलै रोजी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या चार सभांना उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात अजित पवार पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जतला भेट देऊन तेथील स्थानिक महिलांशी थेट संवाद साधतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा खुलासा केला.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे काय म्हणाले ?

'माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या जीवनात एक आदर्श बदल घडवून आणेल.'
'महाराष्ट्र त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल.'
'माझी लाडकी सबहिण योजना ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हृदयाच्या अगदी जवळची आहे.'
'महिलांना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.'
'दरम्यान महिला २१ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. महाराष्ट्र सरकार प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा १,५०० रुपये हस्तांतरित करेल. यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी महिलांच्या बँक खात्यात वार्षिक ४६,००० रुपये देण्याची तरतूद केली आहे', असेही तटकरे यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री


jaimaharashtranews-logo