Wednesday, September 04, 2024 03:02:38 PM

नार्वेकर आमदार झाल्याने वरुण अस्वस्थ ?

महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी या दर दिवसाला काहीतरी नवं समोर आणत असतात. त्यातच आता  मिलिंद नार्वेकर हे आमदार झाले आणि नार्वेकरांना आमदारकी मिळाल्यानंतर वरुण सरदेसाई अस्वस्थ

नार्वेकर आमदार झाल्याने वरुण अस्वस्थ

महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी या दर दिवसाला काहीतरी नवं समोर आणत असतात. त्यातच आता  मिलिंद नार्वेकर हे आमदार झाले आणि नार्वेकरांना आमदारकी मिळाल्यानंतर वरुण सरदेसाई अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. तर वरुण सरदेसाईसाठी मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू असल्याचेही समोर येत आहे. तसेच आता वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे.

'मातोश्री'वर काय घडलं?
वरुण सरदेसाई उद्धव यांचा भाचा
वरुणच्या आईची बहीण आहेत रश्मी 
वरुण सरदेसाईला आमदार होण्याची इच्छा
कल्याण पूर्व मधून वरुणच्या उमेदवारीसाठी उद्धव यांच्यावर दबाव
एकनाथ शिंदे यांच्या तीव्र विरोधामुळे वरुणची पहिली संधी गेली. 
वरुणची नाराजी काढण्यासाठी युवा सेनेचे प्रमुखपद 
विधान परिषदेच्या २०२४च्या निवडणुकीत पुन्हा वरुणची दावेदारी
'अनिल परब यांच्या ऐवजी वरुणाला तिकीट द्या'
घरातूनच उद्धव यांच्यावर पुन्हा दबाव
वरुण ऐवजी अनिल परबांच्या पारड्यात उद्धव यांचे वजन 
यातच मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने घरात धुसफुस
मिलिंद नार्वेकर विधिमंडळात आणि वरुण घरातच राहिल्याने अस्वस्थ 
नार्वेकर विधिमंडळात गेल्यावर वरुणचे विधानसभेसाठी प्रयत्न
वरुणसाठी उद्धव काँग्रेसशी भिडण्याचा तयारीत 
वरुणकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात चाचपणी
झिशान सिद्दीकीने काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने मातोश्रीचा मतदारसंघावर दावा

मिलिंद नार्वेकरांच्या आमदारकीनंतर वरुण सरदेसाई नाराज असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वरुण सरदेसाई हे आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे वरुण सरदेसाईंसाठी मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे आता वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहण्यार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 


सम्बन्धित सामग्री