Saturday, September 07, 2024 10:10:29 AM

YASHOMATI THAKUR ON BUDGET
'महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला अर्थसंकल्प'

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावर 'महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावणारा अर्थसंकल्प अशी टीका काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांच्याकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला अर्थसंकल्प

२३ जुलै, २०२४ अमरावती : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावर 'महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावणारा अर्थसंकल्प अशी टीका काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांच्याकडून करण्यात आली आहे. 
'सर्वसामान्य, शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये काही मिळालेले नाही. या पूर्ण अर्थसंकल्पात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना विशेष वागणूक दिली गेली आहे.' 'या अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि विदर्भाकडे दुर्लक्ष केलं गेलंय' 'अमरावतीसह विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी यात काही दिसत नाही' 'या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे', अशी टीका यशोमती ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर केली आहे. 
मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर, मंगळवारी २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प आज सादर केला. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा हा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री