Thursday, May 01, 2025 10:18:15 PM

राहुलना निमंत्रण देण्याचा अधिकार पवारांना कोणी दिला?

राहुलना निमंत्रण देण्याचा अधिकार पवारांना कोणी दिला? असा सवाल भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.


राहुलना निमंत्रण देण्याचा अधिकार पवारांना कोणी दिला
Tushar Bhosale

पुणे : हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला ? असा सवाल भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे. तसेच शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते पण शरद पवारांचे त्यांच्या ८४ वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देताहेत असाही प्रश्न त्यांनी पवारांना केला आहे.

पुढे आचार्य भोसले यांनी कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत म्हणत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. आता महाराष्ट्राच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघताय हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा अशी घणाघाती टीका आचार्य भोसले यांनी पवारांवर केली आहे.


सम्बन्धित सामग्री