मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सध्या राजकीय अंधश्रद्धा पाहायला मिळत आहे. रामटेक बंगल्यानंतर आता मंत्रालयातल्या 602 क्रमांकाच्या दालनामुळे मंत्र्यांना घाम फुटायला लागल्याचे चित्र आहे. कोणीही मंत्री हे दालन घेण्यास तयार नाही. भूतकाळात या दालनात काम केलेल्या अनेक नेत्यांना राजकीय जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. तर काहींना थेट राजीनामाही द्यावा लागलाय. सध्या भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना हे 602 क्रमांकाचे दालन देण्यात आलं आहे. या दालनाचे गूढ काय आहे याची चर्चा सर्वत्र आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मंत्रालयातील दालन क्रमांक 602 ला सर्वच राजकीय नेत्यांकडून नकारघंटा येत आहे. राज्य मंत्रालयातील सर्वात प्रशस्त दालनांपैकी एक असलेलं दालन आहे. या दालनामुळे राजकीय अडचणींचा सामना करावा लागला अशी समजूत आहे.
हेही वाचा : Satish Wagh Murder Case: मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मंत्रालयातील 602 चा इतिहास
1. 1999 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांकडे होती. भुजबळ 2003 मध्ये तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकले.
2. भुजबळांनंतर अजित पवारांचं नावं सिंचन घोटाळ्यात आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला
3. 2014 मध्ये भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंचं नाव जमीन घोटाळ्यात आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
4. खडसेंनंतर हे दालन पांडुरंग फुंडकरांकडे गेलं. 2018 मध्ये त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
5. फुंडकरांनंतर भाजप नेते अनिल बोंडेंकडे दालन आलं, त्यांचा 2019 मध्ये निवडणुकीत पराभव झाला.
6. सध्याच्या सरकारमध्ये हे दालन भाजप मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सामाजिक कार्य विभागाला देण्यात आलं आहे.
7. मात्र या दालनाच्या मागचा इतिहास पाहता भोसलेंच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त होतं आहे.
8. सध्या हे दालनाचा वापर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे तर शिवेंद्रराजे भोसले बाजूची खोली वापरत आहेत.