मुंबई : बंदरे व मत्यस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी गरवारे क्लब येथे जेवणाचे आयोजन केले आहे. या निमित्त त्यांनी अनेक राजकीय मंडळींना आमंत्रण दिले आहे. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आमंत्रण देण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंची गळाभेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
मंत्री नितेश राणे यांच्या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड आले आहेत. त्यांनी नितेश राणेंची गळाभेट घेतली आहे. तसेच आव्हाड राणेंच्या कानात कुजबुजले. यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड नितेश राणे यांच्या कानात काय म्हणाले असतील याबद्दल सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ऐरवी एकमेकांवर ताशेरे ओढणारे नेते गळाभेट करताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला आहे.
हेही वाचा : Sunita Williams: सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार
दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी हिंदू धर्मातील खाटीकांसाठी एक नवा उपक्रम काढला होता. यामध्ये हिंदू धर्मातील खाटीकांना मल्हार सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल अशा खाटीकांकडून मटण विकत घेण्याचे आवाहनही राणेंने केले होते. यावर थेट जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केला आहे. सगळं शांत सुरू असताना आग लावायची गरज काय?, कोणी कसं खावं, कधी खावं हे तुम्ही सांगणारे कोण? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणेंना केला आहे. यावरुन आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.