परभणी : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार संजय जाधव, नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले .
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'मंत्रीच आता आरोपींना सांभाळत आहेत'
परभणीतील मोर्चातून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. देशमुख कुटुबीयांना धक्का लागला तर मुंडेंना फिरू देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाने खूप सहन केले आहे. आधीच त्यांनी देशमुख यांना गमावलं आहे. आता त्यांना कोणताही त्रास झाला तर कोणालाही रस्त्यावर फिरू देणार नाही असा आक्रमक पवित्र मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
एकही आरोपी बाहेर येता कामा नये, नाहीतर सोडणार नाही अशी वॉर्गिंग जरांगेंनी दिली आहे. देशमुख कुटुंबाला धमकी देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हल्ले झाले तर जशाच तस उत्तर द्यायचे अस मनोज जरांगे म्हणाले.
हेही वाचा : आमदार धसांचा अजित पवारांवर निशाणा
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मंत्रीच आता आरोपींना सांभाळत आहेत अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली आहे.