Friday, October 18, 2024 01:35:31 PM

vijay wadettiwar on budget
'महाराष्ट्राला सावत्र वागणूक का ?'

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावर 'महाराष्ट्राला सावत्र वागणूक का ?', असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

महाराष्ट्राला सावत्र वागणूक का
vijay wadettiwar

२३ जुलै, २०२४ मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावर 'महाराष्ट्राला सावत्र वागणूक का ?', असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. 

'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला, म्हणून अर्थसंकल्पामध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. पण, एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपा सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा !' 'देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का ? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलंय. भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य.. महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल!', असे ट्विट विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर, मंगळवारी २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प आज सादर केला. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा हा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo