पुणे, १८ मे २०२४, प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकालाच्या आधीचं राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. शिउबाठाचे भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन, गुलाल आपलाच...कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय अशा आशयाचा फलक महामार्गावर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणूआधी लागलेल्या या फलकाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी झालेली निवडणूकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राशपकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा निवडणूकीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशातच पुणे - सातारा महामार्गावर लागलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.