Monday, December 30, 2024 11:19:44 PM

Ajit Pawar
बीड प्रकरणी अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.

बीड प्रकरणी अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच पेटले आहे. राजकीय नेत्यांकडून देशमुख कुटुंबियाची भेट घेतली जात आहे. सकाळीच शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेतली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.

अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. बीड प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही. मास्टमाईंड कोणीही असो आम्ही सोडणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी केली जाईल. या घटनेचा सूत्रधार कोणीही असो सोडले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचे आश्वासन दिले. देशमुख हत्या प्रकरणात आम्ही दोन प्रकारची चौकशी करणार आहोत. एक म्हणजे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडून चौकशी केली जाणार आहे. आणि दुसरी म्हणजे न्यायाधीक्षांच्या मार्फत चौकशी केली जात आहे. आरोपींना सोडणार नाही. फाशीची शिक्षा होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत घटनेची चर्चा करत आहेत.

हेही वाचा : बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती; कोण आहेत नवे पोलीस अधीक्षक?

 

बीड नेमकं काय झालं होतं?

एव्हाडा एनर्जी यांनी बीडमधील पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. या मधून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे. यात अशोक घुले, नारायण घुले. प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. तेथील वॉचमनला मारहाण केली. पीडितांनी सरपंचांना फोन केला.आरोपी बाजूच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काहीजण तिथे पोहचले. त्यांना चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली. काही दिवसांनी त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली.

 


सम्बन्धित सामग्री