महाराष्ट्र: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना त्यांचं वक्तव्य चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळतंय. 'ठाकरे गटाला 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं' असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं सर्वत्र चर्चेला एकच उधाण आलं. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. याचेच पडसाद आता उमटत असून नीलम गोऱ्हे यांना हे वक्तव्य चांगलच भोवल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा: शिंदेंना घेरण्यासाठी ठाण्यात जनता दरबार?
नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे. 'नीलम गोऱ्हे हाय हाय', टायरवाल्या काकू, अशा जोरदार घोषणाबाजी करत नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू आहे.
दरम्यान आता हे आंदोलन नेमकं कोणतं वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार असून आता ठाकरे गट यावर काय पलटवार करेल याकडेही सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावरी एक गंभीर आरोप केला होता . उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. त्याचेच हे पडसाद आता पाहायला मिळताय.