Sunday, March 02, 2025 07:44:57 PM

शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले

काही वेळापूर्वी शिंदे ज्युपिटर रूग्णालयात होते.

 शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले

मुंबई : काही वेळापूर्वी शिंदे ज्युपिटर रूग्णालयात होते. आता एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. ते शासकीय बैठकांना उपस्थित देखील राहणार आहेत. पांढऱ्या पेशी वाढल्याने एकनाथ शिंदेंना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून चेकअपसाठी रूग्णालयात आलो असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. परंतु डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.   

शिंदेंची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली. मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही शिंदेंच्या पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज असून त्यांना अशक्तपणा आला असल्याने त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एकनाथ शिंदे दिल्लीतील बैठकीनंतर थेट साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी दरे येथे पोहोचले होते. मुंबईत न थांबता ते त्यांच्या मूळगावी गेल्याने राजकी. चर्चांना उधाण आले होते. शिंदे नाराज असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शिंदे नाराज नसून त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते दरावी गेल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले होते.


सम्बन्धित सामग्री