Sunday, February 23, 2025 12:43:19 AM

SURESH DHAS MEET DESHMUKH AND MUNDHE FAMILY
सुरेश धस यांची मस्साजोगला भेट, देशमुख आणि मुंढे कुटुंबीयांशी चर्चा होणार

सुळे आणि जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर आता आ. सुरेश धस यांची मस्साजोगला भेट, महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा अपेक्षित!&quot

सुरेश धस यांची मस्साजोगला भेट देशमुख आणि मुंढे कुटुंबीयांशी चर्चा होणार

अन्नत्याग आंदोलनाचा इशारा, राजकीय हालचालींना वेग

बीड : आज भाजपाचे आमदार सुरेश धस मस्साजोगला जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर परळी येथे महादेव मुंढे यांच्या पत्नीचीही भेट घेणार आहेत. मस्साजोगे गावातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि महादेव मुंढे यांच्या पत्नीची भेट घेतली होती. त्यानंतर काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली.

👉👉 हे देखील वाचा :  Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना खुर्चीत बसवून नंतर पाणी दिलं.. जोरदार टाळ्या

राजकीय हालचालींना आणखी वेग देत, आज भाजपाचे आमदार सुरेश धस हे देखील या दोन्ही कुटुंबांची भेट घेण्यासाठी मस्साजोगला जाणार आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि पुढील काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासन आणि राजकीय नेत्यांची या घटनेकडे बारकाईने पाहणी सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर अधिकृतरीत्या काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.:


सम्बन्धित सामग्री