पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा कसून शोध सुरू होता. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे. परंतु गाडेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यातच आता या नराधमाला फाशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा: Surya Grahan 2025: चैत्र अमावस्येला लागणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण
अखेर आरोपीला बेड्या
1 पुण्याच्या शिरुर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक
2 रात्री 1 वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
3 आरोपी गुनाट गावच्या शिवारात लपून बसला होता
4 ज्या शेतात आरोपीला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरू होतं तिथं तो सापडलाच नाही
5 दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी 10.30 वाजता आला होता
6 दत्तात्रय गाडेनं नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली
7 माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला
8 नातेवाईकांनी आरोपी दत्तात्रय गाडे आल्याची माहिती पोलिसांना दिली
9 त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला
8 पोलिसांना आरोपीचा बदलेला शर्ट सापडला, त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला
9 डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला
10 मात्र आरोपी ज्या ठिकाणावरुन आला होता तिथे परतलाच नाही
11 आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपू राहिला
12 शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक
13 तब्बल 75 तासांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश
14 100 ते 150 पोलिसांच्या टीमकडून आजूबाजूच्या उसाच्या शेतांमध्ये शोध मोहीम
15 रात्री उशिरापर्यंत गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं अटक करण्यात यश
पुण्यातील या धक्कादायक प्रकरणी कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत वक्तव्य केलंय. दत्ता गाडेसोबत अक्षय शिंदेसारखी पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न विचारला असता, यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता यावर बोलणं खूप लवकर बोलण्यासारखं होईल. आता पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती समोर आली त्या एकत्रित करून यावर बोलणं योग्य राहिलं, असं ही देवेंद्र फडणवीसांनी यांनी सांगितलंय.