Saturday, September 28, 2024 02:03:21 PM

Bhartruhari Mahtab
भर्तृहरी महताब हंगामी लोकसभा सभापती

कटक लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपाच्या भर्तृहरी महताब यांची हंगामी लोकसभा सभापतीपदी नियुक्ती झाली आहे.

भर्तृहरी महताब हंगामी लोकसभा सभापती

नवी दिल्ली : कटक लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपाच्या भर्तृहरी महताब यांची हंगामी लोकसभा सभापतीपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली आहे. भर्तृहरी महताब हे सलग सातव्यांदा कटक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत. आधी बिजू जनता दलमध्ये असलेले भर्तृहरी महताब लोकसभेची २०२४ ची निवडणूक होण्याआधी भाजपात आले. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि कटकमध्ये बिजू जनता दलाच्या संतरुप मिश्रा यांचा पराभव केला. महताब ५७ हजार ७७ मतांनी विजयी झाले. 

संविधानातील कलम ९५ (१) मधील तरतुदीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहरी महताब यांची हंगामी लोकसभा सभापती म्हणून नियुक्ती केली आहे. नियमानुसार कामकाज चालवण्याकरिता सभापतींच्या सहकार्यासाठी काँग्रेसचे के. सुरेश, द्रमुकचे टी. आर बालू, भाजपाचे राधामोहन सिंह आणि फग्गन सिंह कुलस्ते, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

लोकसभेत २४ आणि २५ जून रोजी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना शपथ दिली जाईल. यानंतर २६ जून रोजी नव्या लोकसभा सभापतींची निवड होईल. नव्या सभापतींची निवड होईपर्यंत लोकसभेचे कामकाज हंगामी सभापती भर्तृहरी महताब चालवतील. 


सम्बन्धित सामग्री