Saturday, September 28, 2024 02:00:09 PM

Priyanka Vadra
काँग्रेसने भाकरी फिरवली

वारंवार निवडणुकांमधून अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. प्रियांका वाड्रा वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणार आहेत.

काँग्रेसने भाकरी फिरवली

नवी दिल्ली : वारंवार निवडणुकांमधून अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात निवडणुका लढणाऱ्या काँग्रेसने आता प्रियांका रॉबर्ट वाड्रा यांना पुढे करून राजकारणात नवी सुरुवात करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रियांका वाड्रा वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणार आहेत. 

राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता राहुल यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवरून प्रियांका लोकसभेची पोटनिवडणूक लढणार आहेत. 

राष्ट्रीय राजकारणात आता एकाचवेळी तिसरा गांधी दिसणार आहे. राहुल यांनी वायनाडकरांना ठेंगा दाखवला आहे. या जागेवरून निवडणूक लढवत प्रियांका गांधी वाड्रा राष्ट्रीय राजकारणात येण्याच्या प्रयत्नात आहेत. 

महत्त्वाचे मुद्दे

  1. प्रियांका वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवणार 
  2. एकाचवेळी तिसरा गांधी राजकारणात 
  3. वायनाडकरांना राहुलचा ठेंगा, जागा सोडली 

कोण आहे प्रियांका ?

  1. राजीव आणि सोनिया गांधी यांची मुलगी
  2. फिरोज आणि इंदिरा यांची नात
  3. वादग्रस्त रॉबर्ट वाड्राची बायको 
  4. रॉबर्टवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवल्याचा आरोप
  5. उत्तर प्रदेश काँग्रेस निवडणुकीत थोडकी जबाबदारी 
  6. लडकी हूँ, लड सकती हूँ अशी चर्चित घोषणा दिली 
  7. सध्या उत्तर प्रदेश काँग्रेस सरचिटणीस
     

सम्बन्धित सामग्री