पुणे : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस आहे. काही दिवसांपासून प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगेंमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकतचं दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. त्यांनी पवारांना आरक्षणाबाबत विचारावं. शिउबाठा आणि काँग्रेसलाही ते काही विचारत नाहीत असे दरेकर यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून राजकीय वास येतो आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं याचे प्लानिंग करत आहते. राजकीय भूमिका घ्यायची असल्यास त्यांनी राजकारणात यावं. तसेच राजकीय अजेंडा राबवला नाही तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे प्रवीण दरेकरांनी माध्यमांना सांगितले.