Thursday, March 27, 2025 01:14:25 AM

प्रसाद लाड शिउबाठावर बरसले

भाजपा नेते प्रसाद लाड यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ते शिउबाठावर बरसले आहेत.

प्रसाद लाड शिउबाठावर बरसले
Prasad Lad

मुंबई : भाजपा नेते प्रसाद लाड यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ते शिउबाठावर बरसले आहेत. या पोस्टमध्ये रात्रीच्या पौव्यात आणि सकाळच्या गांज्यात असणाऱ्या संजय राऊतला ब्रँड आणि महाब्रँडमधला काय फरक समजणार अशा शब्दात संजय राऊतांवर टीका केली आहे. जे हिरव्यांच्या मांडीवर जाऊन बसले. पंतप्रधानांचा अपमान होताना सुसंस्कृत घरातून आलेले उद्धव ठाकरे यांनी विचार केला पाहिजे अशी सणसणीत टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

 

त्यानंतर लाड राऊतांवर बोलताना म्हणाले, जो महाब्रँडला ब्रँडी बोलतो, त्या भाडखाऊ संजयला काय कळणार आहे. अशी जहरी टीका त्यांनी राऊतांवर केली. ज्यांनी देशातच नाही तर जगात स्वत:चा महाब्रँड बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना राऊतांची जीभ कशी हासडली नाही अशी

संजय राऊत जे बोलेले ते भांगात बोलले असतील अशी खरमरीत टीका लाड यांनी केली आहे.  

या पोस्टच्या माध्यमातून प्रसाद लाड यांनी शिउबाठाला खडे बोल सुनावले आहेत.

 


सम्बन्धित सामग्री