'अलिकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे, त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी भरीव काम केले आहे'.शरद पवारांचे हे वाक्य संजय राऊतांना चांगलेच झोंबलंय. त्यांनी थेट नेहमीच्या त्यांच्या शैलीत पवारांवर टिका केली. संजय राऊतांनी शरद पवारांसदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांवरच चौफर टीका झालीय. मंगळवारी नवी दिल्लीमधील महाराष्ट्र भवन सदनामध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये राशप गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुकही केलं.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी
शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान करावा,त्याचे कौतुक करावे, नेमकी हीच बाब संजय राऊत यांच्या पचनी पडली नाही. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका करताना शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवार महाविकास आघाडीचे नेते आहेत. खास करून पवार राऊतांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे या टीकेनंतर रोहित पवारांनी ट्विट करून राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
रोहित पवारांचे ट्विट:
राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक
महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा
बाळासाहेब ठाकरे,शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली
पवारांनी राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही
महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर भर दिला
मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित राजकारण केले
हेही वाचा: पवारांच्या गुगलीने ठाकरे गटात अस्वस्थता
शरद पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर शिवसेनेच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. रोज उठून विरोधकांवर शाब्दिक बाण सोडणाऱ्या संजय राऊतांना लक्ष्य करण्याची संधी भाजपासह त्यांच्या विरोधकांनी सोडली नाही. राऊतांच्या पवारविरोधी वक्तव्यावर सर्व पक्षातून राऊतांविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी पवारांची गुगली कोणाला कळत नाही, असं विधान केलं होते, राजकीय पटलावर शरद पवारांच्या या गुगलीने आता थेट संजय राऊतांचीच विकेट निघाली आहे.