Wednesday, March 26, 2025 06:19:16 PM

पवारांच्या गुगलीने ठाकरे गटात अस्वस्थता

शरद पवारांकडून फडणवीस - शिंदे यांचे कौतुक. पवारांनी आरएसएसचेही केले होते कौतुक. पवारांकडून महायुती सरकारचेही कौतुक . पवारांच्या कौतुकाने मविआत अस्वस्थता

पवारांच्या गुगलीने ठाकरे गटात अस्वस्थता

दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देताना शरद पवार यांनी शिंदेंचे तोंडभरून कौतुक केलं. एकनाथ शिंदे राजकीय विरोधक असतानाही पवारांनी केलेल्या स्तुतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काही नेत्यांना राजकीय पोटदुखी सुरू झाली. शरद पवार कधी कोणती राजकीय खेळी कोणाविरूद्ध कोणासाठी लढतील याचा नेमका अंदाज अद्याप भल्याभल्यांना आला नाही. पवारांची ही राजनिती अनेक नेत्यांना राजकीय उलथापालथ झाल्यावर लक्षात येते. पवार भाजपा आणि आरएसएसला विरोधी विचारधारेचे म्हणून नेहमीच टोकाचा विरोध करत आले आहेत. मात्र अनेकदा पवारांनी याच भाजपा आणि आरएसएसचे जाहीर व्यासपीठावर कौतुकही केले आहे. पवार महाराष्ट्राची  सामाजिक आणि सांस्कृतिक वीण अधिक घट्ट करतात असं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे. पण खरोखरीच पवार केवळ ही वीण घट्ट करत असतात की त्यांच्या राजकीय समीकरणातील बेरीज आणि वजाबाकी वेगळ्या असतात..

हेही वाचा: 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा जप्त

पवारांकडून आरएसएसचे कौतुक: 
आरएसएसची काम करण्याची पद्धत अनोखी आहे
संघाकडे समर्पित स्वयंसेवक आहेत
कोणत्याही परिस्थितीत स्वयंसेवक विचलित होत नाहीत
संघ एखाद्याच्या आयुष्यातील 20 वर्षे घेत असतील तर त्याला वाऱ्यावर सोडत नाही
संघाचे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना विविध संस्थांवर नियुक्त केले जाते
भाजपाच्या विजयात संघ स्वंयसेवकांच्या कठोर परिश्रमाचा मोठा वाटा 
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयाचे श्रेयही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते

बीड आणि परभणीच्या हत्यांच्या घटनांनंतर राज्यात जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी पवारांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करून परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी एकट्या फडणवीसांना याचे जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांची थेट बाजू घेतली होती. शरद पवार यांच्या आरएसएस आणि फडणवीस यांच्याबाबतच्या कौतुकांच्या विधानांनंतर फडणवीस यांनी पवारांबाबत वक्तव्य करताना ते अतिशय चाणाक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस काय म्हणालेत पाहा..

हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी

फडणवीस काय म्हणालेत? 
शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत, त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल 
त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढे मोठे वायू मंडळ तयार केले होते
ते वायूमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोण आहे? 
ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. 
तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे, शेवटी कधीतरी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे लागते
म्हणून त्यांनी आरएसएसचे कौतुक केले असावे
राजकारणात काहीही होऊ शकते, खूप ठामपणे असे होणारच नाही, असं म्हणता येत नाही
असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा परिस्थिती तुम्हाला कुठे नेईल याचा भरवसा नाही

शरद पवारांचे आजवरचे काही राजकीय अनुभव पाहता त्यांचे वक्तव्य आणि  कृती यांचा नेमका अंदाज लावता येत नाही.. आता शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. पवारांची ही गुगली नक्कीच कोणा एका राजकीय कारणासाठीच असेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. याच पवारांनी भाजपा- शिवसेनेची युती असताना भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर करत शिवसेनेत त्यावेळी अस्वस्थता पसरवली होती. अशी एक ना अनेक उदाहऱणे आहेत. ज्यामध्ये  पवारांची राजकीय खेळी तत्काळ लक्षात येत नाही. 


सम्बन्धित सामग्री