मुंबई : देशात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टर्ममध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे. पुढच्या आठवड्यातच अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. लोकभा उपाध्यक्षपदावर विरोधकांचे लक्ष लागले आहे. उपाध्यक्ष पदावर विरोधकांची नियुक्ती न झाल्यास लोकसभा अध्यक्षपदी विरोधक आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडीची प्रक्रिया २६ जूनपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा चालु आहे.