Friday, May 16, 2025 06:04:22 PM

एवढी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती दोन कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये एवढी आहे. ही आकडेवारी सरकारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

एवढी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती

मुंबई, १४ मे २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती दोन कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये एवढी आहे. ही आकडेवारी सरकारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. मोदींच्या संपत्तीची ही माहिती ३१ मार्च २०२२ पर्यंतची आहे. यानंतर पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत झालेल्या बदलांची माहिती जाहीर झालेली नाही. मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. नियमानुसार या अर्जात त्यांनी संपत्तीबाबतची ताजी माहिती दिली आहे. ही माहिती लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाईल.

सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार मोदींच्या २०२२ मध्ये जाहीर संपत्तीपैकी गुजरातमधील गांधीनगर येथील स्टेट बँकेत ४६ हजार ५५५ रुपये आहेत. ही रक्कम बचत खात्यात आहे. ठेवींच्या स्वरुपात स्टेट बँकेत मोदींनी दोन कोटी १० लाख ३३ हजार २२६ रुपये आहेत. मोदींच्या मालकीचे घर नाही तसेच त्यांच्या मालकीचे वाहन नाही.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये ९ लाख ५ हजार १०५ रुपये मोदींनी ठेवले आहेत. तसेच त्यांच्याकडे १८ लाख ९ हजार ३०५ रुपयांचा जीवन विमा आहे. मोदींकडे सोन्याची चार वळं आहेत. या वळांचे एकूण वजन ४५ ग्रॅम आहे आणि त्यांची किंमत १ लाख ७३ हजार ०६३ रुपये एवढी आहे.


सम्बन्धित सामग्री