मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचं अस्तित्व धोक्यात आले आहे. राज ठाकरे पक्षाची स्तिथी सुधारण्यासाठी कोणती नवीन पाऊले उचलणार ह्या गोष्टीवर सर्वांचेच लक्ष आहे. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत 1आमदार निवडून येत असलेल्या मनसेचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही.
ह्या सगळ्या गोष्टी सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी नंतर दिलेलं वक्तव्य की 'मनसेला महापालिकेत सोबत घेण्याची इच्छा आहे'. डीडी सह्याद्रीशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. फडणवीस पुढे म्हणले की 'लोकसभेत राज ठाकरेंनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला आणि त्याचा आम्हाला फायदा देखील झाला. पण विधानसभेत हे शक्य नव्हतं. जागा सोडणं हे त्यांचा पक्षासाठी हानिकारक ठरू शकलं असतं. त्यांचे आणि आमचे विचार मेळ खातात त्यामुळे सरकार सोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्ही त्यांना सोबत घेऊ.'
ह्या विषयी बोलताना शिवसेनेचे उदय सामंत म्हणले कि 'हा त्यांचा निर्णय असू शकतो, देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेशी देखील चर्चा करतील.' शिवसेना उबाठाचे संजय राऊत म्हणले कि 'राज ठाकरे हे खेळवले जात आहे हे स्पष्ट दिसतंय. देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत राज ठाकरे काय करणार आहेत'
फडणवीसांच्या ह्या वक्तव्याने राजकीय समीकरणे बदलू शकतात. फडणवीसांच्या ह्या विधानावर अद्याप मनसेकडून प्रतिक्रिया आली नाही आहे. पण, मनसेची ही प्रतिक्रिया बघण्यायोग्य असेल. मनसेचं भाजपाला साथ घेण्याचं मत महायुतीवर कसा प्रभाव पाडेल हा देखील पाडेल आणि शिंदे व पवारांची भूमिका ह्यावर कशी असेल हा देखील मोठा प्रश्न उध्दभवतो.