नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी खटल्याशी संबंधित सर्व पक्षकारांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. शिवसेना, शिउबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राशप हे चार राजकीय पक्ष या खटल्यातील प्रमुख पक्षकार आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली
सुनावणी दोन आठवड्यांनी होणार
कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी दिला अधिकचा वेळ