Wednesday, March 19, 2025 05:22:42 PM

नागपूरातील हिंसाचार प्रकरणावरुन मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातील अब्बा आठवणीत येईल अशी कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

नागपूरातील हिंसाचार प्रकरणावरुन मंत्री नितेश राणे आक्रमक


मुंबई : नागपूरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या प्रकरणामुळे हिंसाचाराची घटना घडली. दोन गटात हाणामारी झाली. ही घटना पूर्वनियोजित होती. पोलिस कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर हल्ला का केला? एका पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. थेट पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही शांत बसणार नाही. पाकिस्तानातील अब्बा आठवणीत येईल अशी कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. 

कालच्या नागपूरातील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केले आहे. दुपारी विषय संपला होता पण संध्याकाळी काही जण आंदोलनला आले. हे पूर्वनियोजित आहे. पोलिस कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत होते.  त्यांच्यावर हल्ला का केला असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. एका पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार पण हा कोणता प्रकार आहे. सभागृहात यावर कोणीही बोलत नाही. ट्रकभर दगड आले कुठून या सगळ्याची चौकशी होईल अले राणे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : आव्हाड राणेंच्या कानात काय म्हणाले ? राजकीय वर्तुळात चर्चा

पुढे बोलताना,  जिहादी मानसिकता असणाऱ्यांना चोप देणार आहे. याची सुरूवात अबू आझमीने केली. पाठ्य पुस्तकात चुकीच माहिती टाकण्याचं पाप काँग्रेसचे आहे असा घणाघातही राणेंनी केला आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण सत्ताधाऱ्यांकडूनच झाले अशी टीका ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी केली आहे.
  
नेमकं काय घडलं? 

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील या संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान हिंसाचारात झालं.मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठा गट जमला होता. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी गटानेही प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगवेगळं केलं आणि जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कालांतराने हा जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली.


सम्बन्धित सामग्री